प्रतिनिधी | स्वाती हडकर
चिपळूण : पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच संबंधित आरोपींना अद्याप अटक न झाल्याच्या पार्श्वभूमीवर राधा ही फाउंडेशनतर्फे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मूक मोर्चा उद्या सकाळी ११ वाजता बहादूर शेख नाका येथून सुरू होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जाईल.
पत्रकारांवरील हल्ला हा लोकशाहीवरील आघात असल्याची भावना व्यक्त करत, आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. मोर्चा शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राधा ही फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
