राज ठाकरेंनी लेकावर सोपवली मोठी जबाबदारी…
नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जिल्हा संपर्क प्रमुखांची नावे जाहीर केली आहेत.
या नावांमध्ये पक्षातील महत्वाच्या नेत्यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. तर पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पुत्र अमित ठाकरे यांच्यावर देखील मोठी जबाबदारी सोपवली आहे.
सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, या सगळ्यात राज ठाकरेंनी पक्षाची मोट आणखी घट करण्यासाठी संपर्क प्रमुखांची नियुक्ती केली आहे.
मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंनी संपर्क अध्यक्षांची बैठक घेत पक्षवाढीचा रोडमॅप मांडून नव्या नेमणुका जाहीर केल्या.
राज ठाकरे यांनी एक पत्रक दिले असून, यामध्ये काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्याचे पालन करावे, असे नमूद करण्यात आले आहे.
पक्षातील नेत्यांना काय सूचना?
पक्षाची धोरणं वेळोवेळी निष्ठेनं राबवावी आणि यामध्ये नेत्यांकडून कोणतीही कुचराई किंवा तडजोड स्वीकारली जाणार नाही. आपण व आपल्या सहकाऱ्यांकडून समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही अशा प्रकारचे आपले वर्तन असेल हिच अपेक्षा! मराठी बांधवांना भगिनींना आणि मातांना अभिमान वाटेल अशा प्रकारचे कार्य आपल्या हातून घडो, असं हक्कानं नेत्यांना सांगण्यात आलं. प्रत्येक महिन्यात किमान 3 दिवस संबंधित जिल्ह्यास भेट देऊन कामाचा आढावा घ्यावा. स्थानिक नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्या. त्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. आगामी निवडणुकांचा विचार करता पुढील साडेतीन वर्षाच्या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे.
हे आहेत नवे संपर्क अध्यक्ष
कोकण विभाग :
संदीप देशपांडे, योगेश परुळेकर,
राजेश येरुणकर (रायगड),
शिरीष सावंत, संदीप दळवी (सिंधुदुर्ग), नितीन सरदेसाई,
शिरीष सावंत (रत्नागिरी),
मनोज चव्हाण, संजय नाईक (ठाणे),
प्रमोद (राजू) पाटील, केतन नाईक (पालघर).
मराठवाडा विभाग :
बाळा नांदगावकर, बंटी म्हशीलकर, दिलीप चितलिंगे, बिपीन नाईक (छ. संभाजीनगर),
राजेंद्र वागसकर (धाराशिव),
दिलीप धोत्रे (लातूर),
जयप्रकाश बाविस्कर (जालना),
संतोष नागरगोजे, सतनामसिंग गुलाटी (नांदेड).
पश्चिम महाराष्ट्र :
अमित ठाकरे,
अविनाश अभ्यंकर,
अमेय खोपकर (पुणे),
किशोर शिंदे, सुधीर पाटसकर (सोलापूर),
रणजित शितोळे, गणेश सातपुते (सातारा),
यशवंत किल्लेदार, नंदकुमार चिले (कोल्हापूर).
उत्तर महाराष्ट्र :
अविनाश जाधव, अभिजीत पानसे (नाशिक),
प्रकाश भोईर (धुळे),
कर्णबाळा दुनबळे (नंदुरबार),
संदीप पाचंगे, आशिष साबळे (जळगाव),
नयन कदम (अहिल्यानगर).
विदर्भ: हेमंत संभूस (नागपूर),
राजू उंबरकर (अमरावती),
हेमंत गडकरी (अकोला),
प्रशांत कनोजिया (यवतमाळ),
बाळा शेडगे (बुलढाणा)
