दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
१२ मे २०२२ मौजे बोधडी गावात सामाजिक सलोखा राखत मुस्लिम बांधवांनी भोंग्याचा आवाज कमी करून,नवा आदर्श निर्माण केला आहे. गावात सामाजिक एकोप्याचे दर्शन संबंध जिल्ह्यासह महाराष्ट्राने आदर्श घेण्याची नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर भोंग्यावरून प्रचंड राजकारण तापलेले असताना मौजे बोधडी बु.येथे मात्र मुस्लिम बांधवांनी मस्जिद वरील भोंग्याचा आवाज स्वतःहून कमी करून येथे गेल्या अनेक वर्षांपासून असलेले हिंदू मुस्लिम ऐक्य व सामंजस्याचे वातावरण कायम असल्याचे दाखवून दिल्याने त्या निर्णयाचे जागरूक नागरिकांनी स्वागत केले आहे.सध्या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये भोंगा तेथे हनुमान चालीसाचे राज कारण चालू आहे.बऱ्याच ठिकाणी यावरून वाद विवादही होत असल्याचे दिसून येत आहे परंतु बोधडी सारख्या ग्रामीण भागात भोंग्याच्या राजकारणाचा फारसा परिणाम होण्यापूर्वीच येथील मुस्लीम बांधवांनी मस्जिद वरील भोंग्याचा आवाज स्वतःहून कमी केला आणि बोधडी येथे गेल्या अनेक वर्षापासून हिंदू मुस्लिमांमध्ये असलेले सामंजस्य कायम ठेवण्यास पुढाकार घेतला या निर्णयाचे श्रीधर डोंगरे,कॉ.आडेलू बोनगीर,नितीन जाधव सर,अविनाश ईजारे यांनी स्वागत केले आहे.
