दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी यशाची अखंड परंपरा जपत लोह्याच्या श्री संत गाडगे महाराज माध्यमिक विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
शालांत परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून श्री संत गाडगे महाराज माध्यमिक विद्यालय लोहा येथील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केल्याचे दिसून आले.शाळेचा एकूण निकाल 99.74 टक्के लागलेला आहे. त्यात व्यंकटी गोपाळ इंगळे या विद्यार्थ्यांने 99 टक्के गुण घेऊन विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तर कु. लक्ष्मी दिगंबर मुसळे ह्या विद्यार्थिनीने 98.20टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तर कु.वैष्णवी विजय टेकाळे ही विद्यार्थिनी 97.80 गुण घेऊन विद्यालयातून तृतीय आली आहे.
यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक व संचालक ,ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व आमदार, भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब, आणि संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तमरावजी धोंडगे यांनी कौतुक व अभिनंदन केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक डी. एस. बोधगिरे,उपमुख्याध्यापक अनिल जाधव साहेब,उपप्राचार्य ए.पी.दापके,पर्यवेक्षक बि.डी.जाधव बी.आर.पाटील, दिलीप सूर्यवंशी, हरी पा.शिंदे,प्रा.गजानन जामगे,प्रा.बबन पवार,आय.बि. शेटे,एस पी पाईकराव ,सौ.हराळे मॅडम ,अमोल ढगे,गोवर्धन शेंडगे, आदीसह शिक्षक बांधव,शिक्षिका भगिनी,सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.
परिक्षेला बसलेल्या एकूण 396 विद्यार्थ्यांपैकी 354 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण तर 35 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून 90 टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे 143 विद्यार्थी आहेत.
संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण घेणारे 04 विद्यार्थी आहेत. तर 99 गुण घेणारे नऊ विद्यार्थी आहेत. विज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण घेणारे दोन विद्यार्थी आहेत तर 99 घेणारे 19 विद्यार्थी आहेत. गणित विषयात 99 गुण घेणारे तीन विद्यार्थी आहेत. सामाजिक शास्त्र या विषयात 100 पैकी 100 गुण घेणारा 01 विद्यार्थी तर 99 गुण घेणारे दोन विद्यार्थी आहेत.
