दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
कोरपना तालूका आवाळपूर
चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो चंद्रपूर जिल्ह्यात मोठ मोठे सिमेंट कारखाने आहेत व WCL कोयला खदान आहेत गडचांदूर,नांदा फाटा, आवाळपूर,सांगोळा, अंतरगाव या मूख्य रस्त्यांची खूपच वाईट अवदश्या झाली आहे,
नांदा फाटा, आवाळपूर, सांगोळा, अंतरगाव,हा मूख्य रस्ता आहे यांच मार्गाने अल्ट्राटेक सिमेंट कंपनी चे कामगार जिव धोक्यात घेवून आपली डिवटीला जातात तसेच नांदा फाटा,ते आवाळपूर या मार्गावर पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय आहे या शाळेत शिकत असणारे विद्यार्थी सूध्दा आपला जीव धोक्यात घालून शाळेत ये जा करतात या मार्गांवर बरेचदा अपघात झाले तरी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले चूकून एखाद्या दिवशी दखादी वाईट घटना घडली तर याला जबाबदार कोण,
काही संघटनांनी तर काही राजकीय पक्षांनी प्रशासनाला निवेदन देण्यात आले तरी पण प्रशासनाला जाग आली नाही या मार्गावरून दररोज प्रवास करण्यासाठी नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो,
म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले नांदा फाटा शिवाजी महाराज चैक इथे आंदोलन करत्यांनी ठिय्या आंदोलन केले यावेळेस तब्बल एक तास वाहतूक बंद ठेवण्यात आली होती
बांधकाम विभाग अभियंता बाजारे यांनी आंदोलन स्थळ इथे भेट देवून १५ दिवसांच्या आत रोड वरील सर्व खड्डे भूजवण्याचे काम सुरू करू असे आश्वासन देवून आंदोलन मागे घेण्यात आले,
या आंदोलनात मनसे चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मनसे चे नगरसेवक व जिल्हा संपर्कप्रमुख सचिन भोयर, शहर अध्यक्ष मनदिप भाऊ रोडे, वाहतूक सेना प्रमुख भरत गूप्ता, महिला शहर अध्यक्ष प्रतिमा ताई ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष माया ताई मेश्राम, जय ठाकूर यांच्या उपस्थितीत मनसे चे उपजिल्हा प्रमुख प्रकाश बोरकर, भास्कर लोहबडे , सैरभ दास, निनात बोरकर, शूशांत गोंगले , अंकीत पूरके, पूरूषोत्म पूटावार, यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनाला शेतकरी संघटनेच्या वतीने वामनराव चटप साहेब यांच्या नेतृत्वाखाली नांदा येथिल माजि उपसरपंच पूरूषोत्मजी आस्वले, रत्नाकर चटप सर, आवाळपूर येथिल सरपंच प्रियांका ताई दिवे, उपसरपंच बाळकृष्ण काकडे, सांगोळा येथिल माजि सरपंच सचिन बोढे, हिरापूर येथिल उपसरपंच करून काडे, सूधाकर कूसराम, अजित बोधाने मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते
