दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर(प्रतिनिधी)-आज दि.०५ सप्टेंबर २०२२ रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र साजरा होणारा शिक्षकदिन प.पू.गोळवलकर गुरुजी विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला लाभलेले विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगांवकर व प्रमुख वक्ते सचिन जाधव यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व प.पू.गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले.अर्चना सुरशेटवार यांनी पद्य सादर केले.सर्व वर्ग प्रतिनिधींकडून उपस्थित गुरुजनांना शुभेच्छा देण्यात आल्या.जाधव सचिन हे शिक्षक दिनाचे महत्त्व सांगत असताना डॉ.राधाकृष्णन यांचा जीवन परिचय मुलांना करून दिला.तसेच दगडात देव पाहणारा व प्राणीमांत्रावर दया करणारा प्रत्येक दिवसाला महत्व प्राप्त करुन देणार्या भारतात ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून का साजरा केला जातो? याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
देगावकर दमन यांनी अध्यक्ष समारोपात शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांनी सदैव कृतज्ञता व्यक्त करावे असे याप्रसंगी सांगितले व सहकारी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता बेजगमवार यांनी केले.ज्ञानोपासक मंडळ प्रमुख भानुदास शेळके यांनी या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले व सर्व शिक्षकांच्या सहकार्याने कार्यक्रम घेण्यात आले.
