दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
.
–मौजे इस्लापूर पोलीस स्टेशन येथील पोलीस नाईक पदावर कार्यरतअसलेले बालाजी हासेप्पा काईतवाड बोरगडीकर यांची पोलीस हवालदार,हेडकॉन्स्टेबल बीट जमादार पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा आज कोळी राष्ट्रसंघ संघटने तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी कोळी राष्ट्रसंघ संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष श्री लक्ष्मणदादा जंगेवाड,बीट जमादार श्री पाटील सर,मडावी सर,पांचाळ,कोळी राष्ट्रसंघ किनवट तालुका अध्यक्ष श्री गजानन सोमेवाड,इस्लापूर् येथील सामाजिक कार्यकर्ते माधव कोंकेवाड,गजानन हराले,अमृत हराळे,शिवाजी चव्हाण, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी गडडलवाड,पत्रकार दशरथ आंबेकर यांची आवर्जून उपस्थिती होती.
पोलीस स्टेशन इस्लापूर येथील पोलीस नाईक बालाजी हासेप्पा काईतवाड यांच्या पोलीस खात्यातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन प्रशासनाने पोलीस हवालदार हेडकॉन्स्टेबल म्हणून पदोन्नती केली आहे.यापूर्वी त्यांनी नक्षलग्रस्त भागातील गडचिरोली जिल्ह्यात सलग दहा वर्ष सेवा पूर्ण केलीअसून नक्षलवादी यांचे सोबत तीन वेळेस चकमक झाली होती. हेडकॉन्स्टेबल काईतवाड हे कुस्तीपटू पैलवान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत.त्यांचे वडील बंधू श्री दत्ता हासेप्पा काईतवाड यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे.दत्ता काईतवाड हे देखील मराठवाड्यातील प्रसिद्ध पैलवान म्हणून कार्यरतआहेत.दोन्ही भाऊ पोलीस खात्यात चांगले कर्तव्य पार पाडतअसल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होतआहे.
