दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
विसापूर (ता.तासगांव) येते माहेरी आलेल्या पत्नीचा माहेरातच चारित्र्यांच्या संशयावरुन पतीनेच खून केल्यांची धक्कादायक घटना समोर आली आहे. यांमध्ये काजल प्रताप जाधव (वय२३रा.आळसंद ता.खानापूर) असे मृत पत्नीचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन पती प्रताप आनंदा जाधव हा वारंवार पत्नीवर चारित्र्यांच्या संशय घेत होता. याबाबत काजलची बहिण सोनम उर्फ गीता संदीपान कांबळे हिने तासगांव पोलीस ठाण्यांत फिर्याद दिली होती. याच दरम्यान तासगांव पोलिसांनी काही तासांतच पतीच्या मुस्क्या आवळल्या. कालचा विवाह प्रतापसोबत काही वर्षांपूर्वीच झाला होता या दांपत्याला विनायक (वय७) तर वेदांत (वय५) अशी दोन मुले आहेत. सुरुवातीला काही वर्ष संसार सुरळीत चालला होता. मात्र नंतर वादाला सुरुवात झाली काजलच्या चारित्र्याविषयी पती प्रताप हा संशय घेत होता. दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यातील वाद अनेकदा मिटवले होते. मात्र भांडण मिटले नव्हते. सततच्या वादाला कंटाळून काजलच्या आई-वडिलांनी तिला माहेरी विसापूर येथे आणले होते. याच दरम्यान घरात कोणी नसताना पती प्रताप याने येवुन पत्नी काजल हिचा खुन केला. या घटनेची नोंद तासगांव पोलीस ठाण्यांत नोंद झाली असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके करीत आहेत.
