दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मुंबई-संभाजी गोसावी
मुंबई. राज्यांतील असमानी संकट आणि हैराण झालेल्या शेतकऱ्यांना शिंदे, फडणवीस सरकारकडूंन दिलासा मिळाला असून. केंद्रातील पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर नव्या सरकारकडूंन मुख्यमंत्री किसान योजना सुरु होणार असल्यांची माहिती समोर आली आहे. देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासांठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान योजना सुरु केली असून. त्याच धर्तीवर शिंदे ,फडवणीस सरकारांने मुख्यमंत्री किसान योजना आणण्याची तयारी नव्या सरकारांने केली आहे. यामध्ये राज्यांत जून ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून २५ लाख ९३ हजार शेतकरी बाधित झाले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीद्वारे बाधित शेतकऱ्यांना ३,५०१ कोटी रुपयांची मदत रक्कम वाढीव दरांने वितरित केली जाईल. व मदत व पुनर्वसन विभागामार्फत आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मंजूर केलेली मदत तातडीने वाटप करण्यांचे आदेशही देण्यांत आले आहेत. शेतकऱ्यांना मदतीची रक्कम संबंधित विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करण्यांत आली आहे. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ऑनलाइन जमा करण्याचेही आदेश यावेळी देण्यांत आले आहेत. या संदर्भातील शासन निर्णय महसूल व वन विभागांने ८ सप्टेंबर २०२२ रोजी जारी केला आहे.
