दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड- गोविंद पवार
गणेश चतुर्थी पासून आज अकराव्या दिवशी ला म्हणजे अनंत चतुर्थीला मोठ्या उत्साहात जल्लोषात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”, च्या घोषणा देत गणेश भक्तांनी श्री गणेशाला निरोप दिला.शहरातील परवानाधारक व आजूबाजूच्या खेड्यातील एक गाव एक गणपती सर्व परवानाधारक गणेश मंडळांनी, गणेश भक्तांनी अतिशय शांततेत विसर्जन केले.
गेली दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवासह सर्वच सण,धार्मिक उत्सव साजरे करता न आल्यामुळे जनतेच्या आशा आकांक्षा वर जणू पाणीच फिरले. परंतु यावर्षी कोरोनाचे नियम शिथिल झाल्यामुळे गणेश भक्तांना आनंद द्विगणित करता आला.लोहा शहरातील गणेश भक्तांनी अनंत चतुर्दशी निमित्त पारंपरिक वाद्यांच्या गजरात,विविध वेशभुषेतील देखाव्यांसह अनेक बाल-युवक गणेश भक्तांनी आपापल्या गणेश मंडळांच्या समोर वाजत गाजत आनंद व्यक्त केला.
बाप्पांच्या विसर्जना निमित्त “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”, “आला रे आला गणपती आला”, “एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार”, च्या घोषणा देत संपुर्ण लोहा शहर दणाणून गेले. तर अनेक गणेश भक्तांनी पारंपरिक हलगी वाद्यांवर ठेका धरला,ताल धरला.बऱ्याच ठिकाणी गुलाल ऐवजी फुलांचे व पाकळ्यांचे उधळण होत होती.जुना लोहा येथील चव्हाण गल्ली, पवार गल्ली, सह माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या निवासस्थाना समोर मोठ्या थाटामाटात श्री गणेशाची पुजा केली गेली.तर लोहा पोलीस स्थानकासमोर गणेश भक्तांना शरद पवार यांच्या टिमने गणेश भक्तांना मार्गदर्शन केले गेले.
सायंकाळी पोलीस ठाण्यासमोर प्रशासनातील जबाबदार वरिष्ठ अधिकारी गणेश विसर्जनाच्या सोहळ्याला जात असलेल्या गणेश भक्तांवर नजर ठेवून होते.पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी नऊ पासूनच शहरात व हद्दीतील गावांना बंदोबस्त जागोजागी अतिशय योग्य पद्धतीने तैनात केलेला होता.
शहरातील गणपतीचे विसर्जन सुनेगाव तलावात करतांना लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी,विभागीय अधिकारी शरद मंडलिक,डिवायएसपी थोरात तहसीलदार व्यंकटेश मुंडे,नगर परिषदेचे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे,पोलीस निरीक्षक संतोष तांबे,नायब तहसीलदार मोकले, उल्हास राठोड,तलाठी कदम, न.पा.कर्मचारी सह आजी माजी पदाधिकार्यांची उपस्थिती होती.शासनाच्या आदेशाचे पालन करून गणेशभक्तांनी प्रशासनाला मदत करत डिजे वाजलाच नाही.लोहा ठाण्याच्या हद्दीतील गावांना चोख बंदोबस्त पुरवल्या मुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी सांगितले.
