दैनिक चालू वार्ता नांदेड- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड – शहरात गुणवत्तेच्या बाबतीत अव्वल तीन क्रमांकात असलेले श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर व नवीन कौठा नांदेड या कॉलेजचे नाव नांदेडच्या शैक्षणिक पटलावर सतत घेतले जाते सतत प्रकाश झोतात असते त्या अनुषंगाने नुकताच 7 सप्टेंबर 2022 रोजी मेडिकल प्रवेशासाठी अत्यावश्यक असलेल्या नीट परीक्षेचा निकाल लागला असून या नीट परीक्षेमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर व नवीन कौठा नांदेडच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून कॉलेजचे व पालकांचे आणि गुरुजनांचे तसेच संस्थेचे नाव नावलौकिक केले आहे.
NEET EXAM 2022 चा निकाल नुकताच लागला असून या नीट परीक्षेमध्ये श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर व नवीन कौठा नांदेड चे शरद विनायकराव शिंदे यांनी 635 तर कु.आपुलकी अंबादास देशमुख या विद्यार्थीनीने 606 आणि कु. जान्हवी कैलास कुरुडे हिने 565 तसेच कु. डाकुलगे शालीनी या विद्यार्थिनींनी 556 गुण प्राप्त करून नीट परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविले आहे आणि आपापल्या संवर्गातून मेडिकल प्रवेशास पात्र होण्याचा मान मिळवला आहे.
नीट परीक्षेमध्ये उतुंग यश प्राप्त केल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. पुरुषोत्तम केशवराव धोंडगे , संस्था सचिव माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे , सहसचिव अँड .मुक्तेश्वर केशवराव धोंडगे , संस्था सदस्य प्रा.वैजनाथराव कुरुडे , शालेय समिती सदस्य अनुक्रमे एम.पी.कुरुडे , मा.सूर्यकांत कावळे , इंद्रजीत बुरपल्ले इत्यादी मान्यवरांनी नीट परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनी वरून शुभेच्छा देऊन त्यांचे व त्यांच्या पालकांचे आणि गुरुजनांचे अभिनंदन करून कौतुक केले.
शरद शिंदे , कु. आपुलकी देशमुख , कु. जान्हवी कुरुडे , कु.शालीनी डाकुलगे या चारही विद्यार्थ्यांचे नीट परीक्षेमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर व नवीन कौठा नांदेडच्या वतीने विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून शुभेच्छा देऊन भव्य दिव्य सत्कार करण्यात आला हा सत्कार सोहळा ज्युनिअर कॉलेजचे प्रशासकीय दिग्गज मान्यवर प्राचार्य सुधीर कुरुडे , उपप्राचार्य परशुराम येसलवाड , पर्यवेक्षक माधव ब्याळे , ज्येष्ठ प्रा.मुरलीधर घोरबांड , परीक्षा विभाग प्रमुख स्वाती कान्हेगावकर , प्रा.वसंत राठोड .प्रा.रुपाली कळसकर , प्रा. यानभुरे जयवंत सोपानराव यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी विज्ञान विभागाचे प्रा.अमर दहिवडे , प्रा.शिवशंकर देशमुख , प्रा. रेश्मा शेख , प्रा.उमर शेख प्रा.रत्नमाला नवघरे , प्रा.शिवानंद सोनटक्के,प्रा. दिग्रसकर योगेश , प्रा. श्रीवास्तव दीपक , कला व वाणिज्य शाखेतील कौठा विभाग प्रमुख प्रा सय्यद जमील , प्रा.कैलास पतंगे , प्रा. गोविंद मोरे , प्रा. कपिल सोनकांबळे , प्रा. ज्ञानेश्वर लुंगारे , प्रा. विक्रम लुंगारे , प्रा. निलेश मोरेश्वर प्रा वैशाली दुलेवाड , प्रा. शिल्पा पारेकर , प्रा.प्रतिभा जाधव , प्रा, दिपाली जामकर , प्रा. संगिता स्वामी , प्रा संतोष गायकवाड , दै. चालू वार्ता वृत्तपत्राचे नांदेड शहर प्रतिनिधी श्री समर्थ लोखंडे , श्री प्रशांत कुरुडे , श्री बालाजी निरपणे इत्यादी प्राध्यापक मंडळी सह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नीट परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शुभेच्छा दिल्या.
