दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- दि:- १५/०९/२०२२ रोजी विविध मागण्यांसाठी माजलगाव येथे होणार ऊसतोड कामगार मेळाव्यास ऊसतोड कामगार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निलाकांत जाधव गोर सेना मराठवाडा अध्यक्ष यांनी केला आहे.
या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ऊसतोड श्रमिक कामगार संघटनेचे अरुण चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या मेळाव्याला विविध नियमाची लागू असलेल्या मागण्यांवर विशेष मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक प्रतांचे अध्यक्ष ऍड. रविकांत अंगडी बाबू राजेंद्र नायक व राठोड रमेश (दैनिक चालू वार्ता पत्रकार अहमदपूर तालुका प्रतिनिधी) यांची उपस्थिती राहणार आहे.
कामगार ऊसतोड दर २७३ रुपये प्रति टन व यंत्र द्वारे ऊसतोड दर ४५० असे का ? असा सवाल करत ऊसतोड कामगारांना प्रति टन ४५० दर देण्यात यावा ऊसतोड कामगारांचा सर्व प्रकारचा विमा काढण्यात यावा, ऊसतोड कामगारांना कामाच्या ठिकाणी धान्य उपलब्ध करून देण्यात यावे, ऊसतोड कामगारांच्या मूळ-मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह उभारण्यात यावे, मुकदम २५ % टक्के दर वाढविण्यात यावेत आदींसह अनेक मागण्यांवर मंथन होणार आहे या महामेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रा,निलाकांत जाधव गोर सेना मराठवाडा अध्यक्ष संतोष जाधव, संतोष राठोड, प्रदीप राठोड, गजानन राठोड, अंगद राठोड, चंद्रकांत राठोड, किरण राठोड ,अंकुश राठोड, राजेभाऊ राठोड,बाळासाहेब राठोड, लहू,नारायण व इतर पद पद अधिकाऱ्यांनी केले आहे.
