दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: संभाजी ब्रिगेडच्या देगलूर – बिलोली विधानसभा उपाध्यक् पदी ईश्वर देशमुख यांचे निवड. करण्यात आली त्यांच्या या श्रम, वेळ, बुद्धी, कौशल्य व पैसा हे पंचदान देऊन संभाजी ब्रिगेडच्या शंभर टक्के समाजकारण, शंभर टक्के राजकारण या तत्वानुसार आपण समाजकार्यातून पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी राजकीय प्रस्थापिताची मक्तेदारी विरुद्ध महामानवांच्या विचारांची समतावादी व्यवस्था निर्माण होण्यास आपले योगदान महत्वाचे ठरणार आहे. तसेच संभाजी ब्रिगेडच्या वरिष्ठ कार्यकारणीचा सन्मान व आदर आपण करून पक्षाची ध्येय व धोरणे, विचार अंगीकरून नियमावलीचा भंग करणार नाही. सदर नियुक्ती ६ महिण्याठी असून आपले कार्य बघून ते नियमित करण्याचे वा बदलण्याचे सर्व इत्यंभूत अधिकार पक्षश्रेष्ठीकडे ठेवून आपली निवड करण्यात येत आहे.
आपणावर दिलेली जबाबदारी आपण सक्षमरित्या प्रामाणिकपणे पार पाडाल असा विश्वास व्यक्त केलं आहे. त्यांची निवड झाल्याबद्दल देगलूर परिसरातील त्यांच्या मित्रमंडळी व सहकारी तसेच देगलूर कार्यकारणी यांनी त्यांचे सोशल मीडिया मार्फत व भेटी मार्फत त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला पुढील भावी जीवनात चांगले कार्य करण्यासाठी शुभेच्छा पण दिले
