दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी-माधव गोटमवाड
महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संभाजीराव केंद्रे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्याबदल सखोल माहिती देऊन त्यांचा कार्याला उजाळा दिला .
श्रीमती गंगाबाई प्राथमिक शाळा कंधार येथे आज 74 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ , श्रीमती गंगाबाई या महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संभाजीराव केंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
तसेच शिक्षक दिन व गणेश उत्सव निमित्त झालेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण आज संस्थेचे अध्यक्ष व पालक यांच्या हस्ते करण्यात आले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष संभाजीराव केंद्रे साहेब यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्याबदल सखोल माहिती देऊन त्यांचा कार्याला उजाळा दिला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठवाडा कश्याप्रकारे निजामाच्या ताब्यात होता व मुक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक थोर पुरुष यांनी कश्याप्रकारे संघर्ष करून आपल्या प्राणाची आहुती देऊन मराठवाडा मुक्त करण्यासाठी हुतात्मा पत्कारली याविषयी उत्कृष्टपणे आपले मनोगत व्यक्त केले.
सुत्रसंचलन श्रीमती गंगाबाई प्राथमिक शाळा कंधार चे शिक्षक संतोष कांबळे सर यांनी केले तर आभार श्रीमती गंगाबाई प्राथमिक शाळा कंधार चे मुख्याध्यापक मोहम्मद सर यांनी मानले.
यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक बी.एम.केंद्रे ,एम.एस.केंद्रे मॅडम,शेंडगे एस.जि मॅडम,सुनील राठोड सर,माधव गोटमवाड सर , लत्ता बैनवाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धंमध्ये भाग घ्यायला लाऊन तसेच भाषण करण्यासाठी प्रोत्साहित केले.
यावेळी शाळेतील विद्यार्थी,पालक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.
