दैनिक चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी- मन्मथ भुस्से
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात अर्धापूर तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे खुप मोठा योगदान आहे.पाटणूरचा जंगल सत्याग्रह प्रेरणादायी असुन या लढ्यातील एक महत्वची घटना आहे.असे प्रतिपादन सेवा निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ उत्तमराव इंगळे यांनी शनिवारी (ता १७) केले
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पाटणूर येथील हुतात्मा स्मारकाला पत्रकार व स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सेवा निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ उत्तमराव इंगळे, तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रल्हादराव सोळंके, माजी सरपंच चंद्रमुणी लोणे, माजी सरपंच शंकरराव ढगे, पत्रकार गूणवंत विरकर, सचिन गायकवाड, संतोष वाघमारे, छायाचित्रकार संजय जतकर आदी उपस्थित होते.
