दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
परभणी : केन स्टार किड्स प्रि प्रायमरी स्कूल सेलू येथे 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात आला, यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तुळजाभवानी बँक सेलू चे व्यवस्थापक श्री दिपक पवार यांची उपस्थिती लाभली. तसेच शाळेचे प्रिंसीपल तथा संचालक श्रीराम रेंगे व संचालक कृष्णा गीते यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम रेंगे यांनी केले, तसेच शाळेतील विद्यार्थिनी देशभक्ती गीत गायले, त्यांनतर प्रतीक्षा थिटे व अनुसया वाघमारे यांनी मुक्तिसंग्राम विषयीचे शिक्षक भाषण संपन्न झाले, तर आभाप्रदर्शन जया माने यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती इंगोले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका व कर्मचारी वृंद आशा काळे, मुंजाभाऊ शिंदे, मनीष खेडेकर आदी मेहनत घेतली,शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
