दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती:- अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी परतवाडा शहरातील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटना बघता विशेष पथक स्थापन करून सदरचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबत सूचना निर्गमित केल्या होत्या.
दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ रोजी परतवाडा शहरातील आठवडी बाजार परिसरातून मोटरसायकल क्रमांक एम एच १५ डीएक्स ७४३० हिरो स्प्लेंडर चोरीचे सीसीटीव्ही फुटेज परतवाडा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेला प्राप्त झाले.सदर सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासणी केली असता असे दिसून आले की एक अल्पवयीन मुलगा हा फिर्यादीने पार्किंग केलेल्या ठिकाणावरून मोटर सायकल लोटत बाजूला घेऊन जात आहे व थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या दोघांच्या ताब्यात देत आहे.यावरून असे लक्षात आले की मोटरसायकल चोरी करण्यासाठी लहान मुलांचा वापर केला जात आहे.
अनुषंगाने गोपनीय बातमीदार व शहरातील इतर ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून अधिक तपासाकरिता सदर गुन्ह्यामध्ये आरोपी अंकुश गणेश दुरतकर (वय २०) राहणार रामनगर,परतवाडा पवन गजानन तनपुरे (वय १९) राहणार साई मंदिराजवळ परतवाडा व आणखी दोघांसह ३ अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे तपासांती निष्पन्न झाले.
