दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी – नवनाथ यादव
भूम: कुलवंत वाणी समाज ट्रस्टच्या सर्व समन्वयक व मेळावा आयोजन समिती भूम यांनी, “एकच ध्यास,समाजाचा विकास” या विचाराने प्रेरित होऊन कुलवंत वाणी समाजाचा “राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला.यावेळी समाजातील मान्यवर सत्कार सोहळा,रक्तदान शिबीर, भारत देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्षानिमीत्त समाजातील स्वातंत्र्य सौनीकांच्या कुटूबियाचा सन्मान,आरोग्य तपासणी शिबीर या दोन दिवसीय सामाजिक कार्यक्रमाचे मराठवाडा विभागात प्रथमच आयोजन केले होते.सदर कार्यक्रम सर्वांगसुंदररित्या यशस्वीपणे, आनंददायी व उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
या मेळाव्यामध्ये एकुण ३५८ वधु व वर ,यांनी सहभाग घेतला, समाजातील महिला, व समाज बांधवानी १०३ जणानी रक्तदान केले,आरोग्य शिबीरात एकुण १४० जेष्ठ समाज बांधवानी तपसणी केली. वधू, वर पुस्तीकेचे अनावरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावीक प्रशांत होळकर, सुत्रसंचलन रविद्र गोलाडे यानी केले. प्रमुख उपस्थिती भूम नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, जेजुरी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा विणाताई हेमत सोनवणे, माजी उपनगरध्यक्षा सौ.संयोगिताताई गाढवे, नगर जिल्हाचे धर्मादाय आयुक्त अमोल वारघडे, उदयोजक सुरेश तोडकर, दत्तात्रय गुजर, वाशी नगरपंचायतच्या नगरसेविका सौ.संजनाताई शिवशंकर चौधरी, महेश खोले, मेहराज बेग सय्यद, विकास वासकर,धनाजी थोरात आदी मान्यवर उपस्थित होते .
मेळावा यशस्वी करण्यासाठी भूम मेळावा आयोजन समिती सर्व, समन्वयक कुलवंत वाणी समाज ट्रस्ट यांनी परिश्रम घेतले.यावेळी महिला ,समाज बांधवानी विषेश सहकार्य केले, आभार संतोष जठार यांनी मानले.
