दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मुंबई- संभाजी गोसावी
मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी नुकतीच समोर आली आहे. महाराष्ट्रांच्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी गायिका सुलोचना चव्हाण यांचे निधंन झाले आहे. आज दुपारी १२ च्या सुमारांस त्यांनी अखेरचा श्वांस घेतला. त्यांच्या निधनांच्या बातमीने मनोरंजन सृष्टीतील व महाराष्ट्रांतील तमाम जनतेतून हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रांच्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांची प्रकृती गेले काही दिवसापासून खालवली होती. वृद्धपकाळाने त्यांचे निधंन झाले वयांच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वांस घेतला. सुलोचना चव्हाण यांच्या निधनांच्या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या राहत्या घरी म्हणजेच मुंबईतील गिरगाव मधील फणसवाडी येथे त्यांचे निधंन झाले. आज दुपारी १२ वाजतांच्या सुमारांस त्यांनी जगाचा निरोप घेतला. महाराष्ट्रांच्या सुप्रसिद्ध सम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली सुलोचना चव्हाण यांची जाणे ही मराठी कला क्षेत्रांची मोठी हानी आहे आपल्या आवाजाच्या जादूने अनेक लावण्या त्यांनी आज अजरामर केल्या.जवळपास ७० हुन अधिक चित्रपटांतून आपला आवाज देत पार्श्वगायन क्षेत्रांतही त्यांनी आपला चांगलाच ठसा उमटवला होता. जरातारीचा,सोळावं वरीस धोक्यांचे? कसे काय पाटील बर हाय का ? मला हो म्हणतात लवंगी मिरची? यासारख्या असंख्य लावण्या मराठी माणसांच्या मनामनात घर करुन गेल्या होत्या. त्यांना पद्मश्री लता मंगेशकर पुरस्कारांने व संगीत नाटक अकादमी आदी पुरस्कारांने त्यांना सन्मानाचे सन्मानित ही करण्यांत आले होते. लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या पश्चांत धाकटा मुलगा सून नातवंडे असा त्यांचा परिवार होता. त्यांच्या जाण्यांमुळे त्यांचे चाहते मित्रपरिवार व कुटुंब या सगळ्यांनाच चांगलाच धक्का बसला आहे.
