दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा. ग्रामपंचायतच्या प्रचारचे नारळ फुटले राहील फक्त चार दिवस गावागावात प्रचाराणे जोर धरला असून भेटीगाठी भावभावकीतील नाराराजांना ह्या वेळेस आम्ही पुढच्या वेळेस तुम्ही असे आश्वासन देऊन मनधर्णी चालू आहे कोणी शेतातील रस्त्याचे व बांधाचे खुसपट काढत आहेसत्ताधाऱ्याला कोन्ही म्हणतय नळाला पाणि नाही.रस्ता झाला का.काही म्हणतात मला संडास दिला का. मला विहीर दिली का. मह्या दारातून तुह्या नालीच पाणि बंद कर. घरकुल का आलं नाही .तु मला तहवा आस बोलला म्हणून मी अस करणार. त्यामुळे काही उमेद्वाराचा प्रचार करने आवक्या बाहेर गेला. म्हमून बाहेर गावी असणारे ऊसतोडनीला गेलेले तथा मजुरी, उदरनिर्वाहसाठी बाहेर गावी गेलेल्या गावातील मतदारास फोनवर बोलणे तिथे जाऊन भेटणे चालू आहे काय चाललय काय नाही खुशाल का समोरून उत्तर देत मतदार म्हणतोय पाच वर्षात या आधी साधा फोन नाही केला. आता कसं काय प्रेम उफाळून आलं. आरे गावी आलो तर फाट्यावरून पाच किलोमिटर पाई गेलो. गाडीला हात केला तंव्हा गाडीचा काच खाली नाही केला आता मतदानाला येण्यासाठी गाडीची सोय खाण्यापिण्याची व्यवस्था वरून पुन्हा खर्च देता म्हणता मतदानकर मला आताच काय आमचा पुळका आला .आशा प्रकारे बोलून मतदार उमेदवारास धारेवर धरत आहे.
