दैनिक चालु वार्ता म्हसळा-रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
तालुक्यातील देवघर कोंड,कुडतुडी,कोळे,आडी,पाष्टी,घुम आणि इतर ग्रामीण भागात बिबट्याचा वावर आसुन परिसरातील ग्रामस्थांना हम रस्त्यावर प्रत्यक्ष निदर्शनास येत आहे.शनिवार दिनांक १८ मार्च २०२३ रोजी दुपारचे दरम्यान देवघर कोंड परिसरात कुडतुडी रस्त्यावर काही जणांना दोन बिबटे रस्त्यावर शिकरीच्या शोधात असल्याचे दिसले.भयभीत अवस्थेतील नागरिकांनी बिबट्याचे फोटो व चित्रफित काडून जवळच असलेल्या देवघरकोंड गावी पलायन केले.बिबट्या गावाजवळ फिरकत असल्याची बातमी संपूर्ण तालुक्यात पसरली असता खबरदारीचा इशारा म्हणून वनपाल प्रविण शिंदे यांनी सरपंच व परिसरातील ग्रामस्थांना एकटे दुकटे जंगल भागात फिरू नये, पाळीव जनांवरांची खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन करून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
