दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष वार्षिक युवक शिबीर मौजे केरुर या गावात दि.14 मार्च ते 20 मार्च पर्यंत आयोजित करण्यात आले होते . या शिबिराचे शिर्षक ” युवकांचा ध्यास ग्राम – शहर विकास ” हे होते . याठिकाणी पर्यावरण सुरक्षा , बाल विवाह प्रतिबंध , हुडा बंदी कार्यक्रम , मतदार जागृती , प्लँस्टीक बंदी , पशुसंवर्धन लसीकरण शिबीर , मोफत आरोग्य तपासणी व औषध गोळ्या वाटप शिबीर , प्रभात फेरी , विविध मान्यवरांचे उद्बोधन , श्रमदान , परिसर स्वच्छता इत्यादी कार्यक्रम राबविण्यात आले . दि.20 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सांगता कार्यक्रम संपन्न झाला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरभद्र शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सुभाषअप्पा शिवपुजे , प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा.सी.बी.साखरे , देगलूरच्या वै.धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.शंकरराव पाटील नरंगलकर व्यासपीठावर केरुरच्या सरपंच प्रतिनिधी गणेश पाटील , उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते , शालेय समितीचे अध्यक्ष यशवंतराव पाटील नरवाडे , जि.प.शाळेचे मुख्याध्यापक माधवराव पांचाळ , से.स.सो.चेअरमन आनंदराव पाटील , सामाजिक कार्यकर्ते गिरीधर पाटील शिंदे हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्रिय समन्वयक तथा रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे , सूत्रसंचालन स्वयंसेवक महेश वडजे तर आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. भारत केंद्रे यांनी केले .
महात्मा फुले व गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेच्या पुजनानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . यावेळी शिबीरासाठी विशेष सहकार्य करणारे हणमंत शिंदे , किरण शिंदे , गंगाधर डुबुकवाड , पवळे मामा , हरिओम शिंदे यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला . विद्यार्थ्यांच्या मनोगतात कोमल टोकलवाड , रेणुका तुरटवाड , आकांक्षा शिंदे यांनी आपले अनुभव कथन केले . प्रमुख मार्गदर्शक प्रा.शंकर पाटील यांनी आपल्या कुशल मिमिक्री , कविता वाचन , शेरो शायरी च्या माध्यमातून पशु , पक्षी , प्राणी , अभिनेता , खलनायक , राजकीय नेते , रेल्वे , अँम्बुलन्स , मौत का कुँआ , बस आगारातील व रेल्वेची उदघोषणा , इत्यादी आवाज काढून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले . मनसोक्त हास्य कल्लोळात मनमुराद आनंद घेत श्रोतागण पोट धरून हसत होते . या कार्यक्रमाचा लाभ घेणाऱ्या युवकांना या क्षेत्रात भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत . कलाकार आपल्या अंगात असणाऱ्या कलागुणांचा अविष्कार केला पाहिजे असे विचार व्यक्त केले .
महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य प्रा.सी.बी.साखरे यांनी आजपर्यंत केरूरला घेण्यात येणारा प्रत्येक एन.एस.एस.कँम्प यशस्वी झालेला आहे .ती परम्परा कायम राहिल्याबद्दल सरपंच , शाळेचे मुख्याध्यापक आणि ग्रामस्थांचे आभार मानले . युवकांनी आपल्या मनात सामाजिक जाणीव आणि श्रमातून मिळणारा आनंद दीर्घकाळासाठी ह्दयात साठवून ठेवले पाहिजे . आयुष्यातील अनुभव हे सदैव गुरु च्या भूमिकेत काम करत असतो . राष्ट्रीय सेवा योजना हे कल्पकतेला वास्तविक परिस्थितीची झालर असणारा उपक्रम आहे असे विचार मांडले . याप्रसंगी बहुसंख्येने विद्यार्थी , विद्यार्थिनी , नागरिक प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .
