दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
आळंदी देवाची – श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित, श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्यु. कॉलेज, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर, श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, शिक्षक प्रतिनिधी प्रमोद कुलकर्णी, शिक्षकेतर प्रतिनिधी उमेश कुलकर्णी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माऊलींच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने झाली. संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. वेदांत मुरकुटे या विद्यार्थ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वेशभूषेमध्ये ‘मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलतोय’ या भूमिकेतून त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. प्रशांत सोनवणे यांनी बाबासाहेबांच् शिक्षण क्षेत्रातील योगदान व मसुदा समितीचे प्रमुख म्हणून संविधान लेखन करतानाच्या भूमिकेविषयी मनोगत व्यक्त केले. सूर्यकांत मुंगसे यांनी आंबेडकर हे स्वातंत्र्यपूर्व काळातील महात्मा होते, त्यांनी दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनमोल कार्य केल्याचे नमूद केले.अजित वडगांवकर यांनी सांगितले की, देशभरात तसेच परदेशातही अनेक ठिकाणी आपण चौका चौकात बाबासाहेबांचे पुतळे, त्यांच्या नावाने असलेल्या हजारो शाळा, महाविद्यालये व कित्येक विद्यापीठे पाहतो. अनेक रस्त्यांना त्यांची नावे दिलेली आपण पाहतो व आज इतकी वर्षे झाल्यानंतर सुद्धा त्यांचं नाव आदराने निघते व दिवसेंदिवस त्यांचे महत्त्व वाढतंच आहे, यावरूनच आपणास त्यांच्या केलेल्या महान कार्याची ओळख होते . संत साहित्याचा अंतर्भाव किंवा विचार करून आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बनवलेलं संविधान हे फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आजही मार्गदर्शक आहे. देशात समता ,प्रेम व बंधुभाव कायम ठेवण्याचे तसेच समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य त्यांनी केले.
प्रदीप काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.योगेश मठपती यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
