दैनिक चालू वार्ता उप संपादक धाराशिव
धाराशिव/भूम (दिल्ली)-स्वस्त औषधे आणि चाचण्यांसाठी वन रुपी क्लिनिक देशभरात प्रसिद्ध आहे.एक रुपये किमतीच्या प्रिस्क्रिप्शनवर रूग्णांची तपासणी केली जाते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ बनारससह देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांवर वन रुपी क्लिनिकची शाखा सुरू आहे.वनरुपी क्लिनिकने आता मुंबईसह देशात परवडणाऱ्या आरोग्य सेवांसाठी नाव कमावले आहे.भूम येथील भूमिपुत्र,आरोग्यदूत सुप्रसिद्ध वन रुपी क्लिनिकचे संस्थापक डॉ.राहुल घुले यांनी दिल्ली गाठून उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्तरावर स्वस्त दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावही मांडला. मुंबईसह संपूर्ण देशात परवडणाऱ्या आणि उत्तम आरोग्य सेवेवर डॉ.घुले भर देत आहेत. अलीकडेच त्यांनी मुंबईत यासंदर्भातील करारही केला आहे.वन रुपी क्लिनिकच्या शाखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमध्ये तसेच संपूर्ण देशात आरोग्य क्षेत्रात योगदान देत आहेत. सर्व रेल्वे स्थानकांवरील वन रुपी क्लिनिकमधून लोकांना तत्काळ प्राथमिक उपचार मिळत आहेत. वन रुपी क्लिनिकमध्ये रुग्णांना एक रुपयाच्या प्रिस्क्रिप्शनवर उपचार आणि स्वस्त चाचण्याही केल्या जातात.अशा परिस्थितीत महागडे उपचार आणि महागड्या चाचण्यांमुळे सर्वसामान्य, गोरगरीब रुग्णांना ते करणं शक्य होत नसल्याने समाजातील एका वर्गाला आता वन रुपी क्लिनिकमध्ये आशेचा किरण दिसत आहे.
