
आशिया कपवर बहिष्कार; यजमान संघ पुढच्या फेरीत…
ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
दुबई: आशिया कपमधून पाकिस्तानचा संघ बाहेर पडणार आहे. स्पर्धेत आज पाकिस्तानचा सामना यूएई शी होता. पण पाकिस्ताननं यूएई विरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला आहे. जिओ न्यूजनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ आशिया स्पर्धेतून बाहेर झाला आहे. पाकिस्तानी संघानं माघार घेतल्यानं आता यूएईच्या संघाला २ गुण मिळतील. त्यामुळे यजमान संघ सुपर फोरसाठी पात्र ठरेल.