
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी- तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण): जय महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालयात आज दि.17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते, मा. खा. चंद्रकांत खैरे होते, तर प्रमुख पाहुणे पदी शालेय समिती अध्यक्ष सचिन खैरे, शाळेचे प्राचार्य ऋषिकेश पाटील, पालक प्रतिनिधी आनंद जीवने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिवसेना नेते, मा. खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून सैनिकी परेड करून ध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत खैरे यांनी आपल्या मनोगतात मराठवाडा मुक्तीसाठी शहीद झालेल्या व लढा देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करून विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमात सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केलेत. त्यामध्ये कु. अपूर्व अचलखांब, तुकाराम गिरे, प्रतीक लोंढे, अर्णव अचलखांब, यश लगडे, गितेश पवार, निलेश अल्हाट व अजय राठोड इ. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सुमधुर आवाजात सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. हरी कोकरे यांनी मानले.
परेड कमांडिंग इ.12वी.वर्गातील ऋषिकेश माने याने तर ग्रुप कमांडर इ.12वी. तील अभिषेक टाले यांनी जबाबदारी पार पाडली.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सैनिकी विभाग प्रमुख दत्तात्रय लोखंडे, सखाराम गायके, मनोहर परसे, एनसीसी विभाग प्रमुख अनिल जगताप, शिक्षिका श्रीमती सुरेखा जैन, प्रतिभा महाजन, गायत्री चव्हाण व अर्चना स्वामी यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.