
दैनिक चालु वार्ता शिराढोण प्रतिनिधी – गजानन देवणे
शिराढोण :-कंधार तालुक्यातील मौजे शिराढोण ता. कंधार येथील महाराष्ट्राला सुपरिचित असलेल्या श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिमवत केदार वैराग्य पिठाधीश्वर श्री. श्री. श्री. १००८ जगद्गुरू भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी ( शिवाचार्य रत्न श्री. ष. ब्र. प्र. षडक्षर शिवाचार्य महाराज शिराढोणकर ) , यांच्या सान्निध्यात दि. २२ सप्टेंबर २०२५ ते दोन ऑक्टोबर दरम्यान श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव निमित्त दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव काळात दररोज शिवपाठ दुर्गा सप्तसती पायायण , रेणुकविजय पुराण अखंड भगवत्राम सप्ताह रात्री ८ ते ११ , किर्तन व भजन , आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. दि. १ ऑक्टोबर रोजी बुधवारी सायंकाळी सात ते दहा महाप्रसाद , रात्री दहा ते एक वाजता दरम्यान गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री तीन वाजता ( पहाटे ) श्री भीमाशंकर महाराजांच्या पालखीचे अग्नी कुंडातून प्रवेश होईल , त्यानंतर दि. दोन ऑक्टोबर रोजी गुरूवारी विजयादशमी सकाळी ११ वाजता भीमाशंकर पालखीचे विसर्जन व जगदगुरूचे आर्शिवचन होईल.
श्री भीमाशंकर नवरात्र महोत्सव व यात्रेनिमित्त विविध किर्तनकाराचे किर्तनाचे आयोजन केले आहे. यामध्ये दि. २२ सप्टेंबर रोजी सोमवारी रात्री किर्तनकार म्हणून शि. भ. पण. मन्मथ महाराज कुऱ्हाडे धानोर , दि. २३ सप्टेंबर मंगळवारी रात्री शि. भ. पण. शिवानीताई माधव शिवशेट्टे , दि. २४ सप्टेंबर बुधवारी शि. भ. प. कैलास महाराज जामकर ता. जळकोट , दि. २५ सप्टेंबर गुरुवारी शि. भ. प. संगीताताई संतोष बेद्रीकर ता. नायगाव , दि. २६ सप्टेंबर शुक्रवारी शि. भ. प. भिमराव गंगाधर पटणे बावलगाव ता. बिलोली , दि. २७ सप्टेंबर शनिवारी शि. भ. प. अमोल महाराज लांडगे बनवस ता. पूर्णा , दि. २८ सप्टेंबर रविवारी शि. भ. प. मन्मथ अप्पा डांगे गुरूजी ( मोठी लाठी) उस्माननगर ता. कंधार , दि. २९ सप्टेंबर सोमवारी शि. भ. प. आरती कावरे बोरी जि. जिंतूर , दि. ३० सप्टेंबर मंगळवारी शि. भ. प. श्रीदेवीताई कापसीकर लोहा , दि १ ऑक्टोबर रोजी बुधवारी शि. भ. प. विवेकानंद स्वामी साकोळकर उदगीर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी परिसरातील भाविकांनी श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळ्यातील कार्यक्रमास आणि जगद्गुरु यांच्या आर्शिवचनाचा व महाप्रसाद व पालखीचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सदभक्त मंडळी शिराढोण यांनी केले आहे