
दोन दिवसांपासून फोनही बंद…
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्य मातोश्री तसेच दिवंगत मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रा.सू. गवई यांच्या पत्नी कमलताई गवई यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावती येथे होणाऱ्या विजयादशमी सोहळ्याचे निमंत्रण स्वीकाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
कमलताईंच्या हस्ताक्षरात एक पत्रही सोशल मीडियावर कालपासून व्हायरला होत आहे. त्यात कमलाताईंनी निमंत्रण स्वीकारले नाही त्या संघाच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे म्हटले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर कलमताई यांची अधिकृत प्रतिक्रिया आलेले नाही. दोन दिवसांपासून त्यांचा फोन बंद आहे. त्या अमरावतीत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्या नेमक्या गेल्या कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, त्यांचे दुसरे पुत्र राजेंद्र गवई यांनी कमलातईंनी संघाचे निमंत्रण स्वीकारले असल्याचे सांगून या वादावर पडदा पाडला.
कमलाताई गवई यांनी संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्याचे वृत्ती प्रकाशित झाल्यानंतर आंबेडकरी अनुयायांमध्ये मोठा असंतोष उफाळून आला आहे. सोशल मीडियावरही मोठा वाद सुरू झाला आहे. यातच कमलाताईंच्या हस्ताक्षरात एक पत्रही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्यात त्यांनी आपण संघाचे निमंत्रण स्वीकारले नाही. कोणीतरी खोडसाळपणा केला, बातम्या प्रकाशित केल्याचे म्हटले.
पत्रावर कमला गवईंचे नाही?
जे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे त्यावर कमला गवई यांची स्वाक्षरी नाही. त्यामुळे पत्राची सत्यता जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी अमरावतीकडे धाव घेतली. मात्र त्यांना कमलताई अमरावतीमध्ये नाही, असेच सांगण्यात आले. रविवारपासून त्यांचा फोनही बंद आहे. कमलाताई यांच्या एका निकटवर्तीयाने सोशल मीडियावर व्हायरल झालेले पत्र खोटे असल्याचे सांगितले. या पत्रातील हस्ताक्षर आणि भाषा कमलाताई यांची नसल्याचाही दावा करण्यात आला.
विचारधारा बदल नाही…
या सर्व वादावर पत्रकार परिषद घेऊन डॉ. राजेंद्र गवई यांनी कमलताई यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारले असून त्यांना निर्णय अद्याप झाला नसल्याचे म्हटले. तचे संघाची आणि आमची विचारधारा वेगळी आहे. मात्र कोणी कोणाच्या कार्यक्रमाला गेल्याने विचारधारा बदलत नाही. यापूर्वी दादासाहेब गवई हेसुद्धा संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, असेही राजेंद्र गवई यांनी सांगून हा वाद निकाली काढला.