
या देशाचे पंतप्रधान अखेर…
इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध सुरू असून या युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसताना दिसतंय. इस्रायलकडून गाझा शहराला टार्गेट केले जातंय. दुसरीकडे अमेरिका आणि इतर देशही इस्रायलचे मोठे नुकसान करत आहेत.
शिवाय इस्रायल आर्थिक कोंडीत पकडण्याचा डाव रचला गेला. हमासकडूनही इस्रायलला प्रत्युत्तर दिले जात आहे. हे युद्ध थांबावे याकरिता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे प्रयत्न करताना दिसले. त्यांनी यापूर्वी मुस्लीम नेत्यांची आणि हमासची एक बैठक घेतली. यामध्ये एक प्रस्ताव ठेवण्यात आला. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी करार करण्याच्या अगदी जवळ पोहोचले.
हमाससोबच्या बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना भेटीसाठी बोलावले. त्यांच्यासमोर देखील त्यांनी तो युद्ध बंदीचा आणि निर्णयाचा प्रस्ताव ठेवला. या युद्ध बंदीच्या प्रस्तावाला बेंजामिन नेतान्याहू यांनीही सहमती दाखवली. व्हाईट हाऊसमधील आपल्या भाषणात ट्रम्प यांनी या प्रस्तावाला नेतन्याहू यांनी सहमती दिल्याचे सांगत त्यांचे आभार देखील मानले. हेच नाही तर त्यांनी मध्य पूर्वेमध्ये कायमस्वरूपी शांतता आणण्याची संधी असल्याचेही म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मला नक्कीच विश्वास आहे की, हा करार हमास आणि इतर देशांकडून देखील मान्य केला जाईल. जर त्यांनी देखील या प्रस्तावाला सहमती दिली तर युद्ध लगेचच थांबवले जाईल. या युद्धाबाबत व्हाईट हाऊसने त्यांची 20 कलमी योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये तात्पुरत्या गव्हर्निंग बोर्डाची माहिती आहे. या प्रस्तावात स्पष्ट म्हणण्यात आले की, पॅलेस्टिनींना गाझा सोडण्याची आवश्यकता नाही आणि दोन्ही बाजूंनी स्वाक्षरी होताच तात्काळ युद्धबंदीची मागणी केली आहे.
जर हमास देखील सहमत असेल, तर प्रस्तावात सर्व ओलिसांची सुटका करण्याचे आवाहन केले आहे आणि त्यामुळे युद्ध संपेल. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हे युद्ध संपत असल्याची मोठी घोषणा करण्यात आलीये. मात्र, अजूनही हमासच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अगोदरच हमासला हाताशी धरले आहे. त्यामध्ये आता इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू अमेरिकेत गेल्याने हे युद्ध संपण्याचे संकेत आहेत.