
चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर तयार झालेल्या सर्व चित्रपटांवर १०० टक्के आयात-शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा सोमवारी केली. भारतीय चित्रपट अनेक भाषांमध्ये तयार होतात व अमेरिकेतील भारतीय वंशीयांमध्ये लोकप्रिय आहेत.
या निर्णयाचा भारतीय चित्रपटसृष्टीवर मोठा परिणाम होणार आहे.
चित्रपट व्यवसाय इतर देशांनी लुटला
ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ वरील पोस्टमध्ये लिहिले की, आपला चित्रपट व्यवसाय इतर देशांनी लुटला आहे. हा प्रकार एखाद्या बाळाकडून साखरगोळी चोरण्यासारखाच आहे. ट्रम्प यांनी कॅलिफोर्नियाचे डेमोक्रॅट गव्हर्नर राज्यपाल गॅविन न्यूसम यांना त्यासाठी जबाबदार धरले. ही जुनी समस्या संपवण्यासाठी अमेरिकेबाहेर बनलेल्या प्रत्येक चित्रपटावर १०० टक्के शुल्क लागू केले जाईल, असे ट्रम्प म्हणाले.