
इगतपुरी प्रतिनिधी :- विकास पुणेकर
इगतपुरी :- दिनांक ०१/१०/२०२५ रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगर येथे रात्री ११:३० वाजेच्या सुमारास प्रेमसंबंधाच्या वादातुन सुनिल अनिल तावडे रा.कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगर यास आणि त्याचे चुलते प्रविण तावडे यांचेवर जीव घेणा हल्ला झाल्या बाबत इगतपुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १८५/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९,१९०, १९१(२), १९१ (३), १८९(२), ३३३, ३५२, ३५१(२), ३५१(३) सह शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५ आणि ४/२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. या घटनेतील सराईत आरोपी १) कवु ऊर्फ फ्रान्सिस पॅट्रिक मॅनवेल रा. गायकवाड नगर, इगतपुरी, आणि त्याचे इतर साथीदार हे गुन्हा करुन पसार झाले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन इगतपुरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सारीका अहिरराव यांनी तपासाची सुत्रे हाती घेऊन मिळालेल्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण करुन तपास पथके तयार करुन राबविलेल्या शोध मोहिमेव्दारे अवघ्या ६ तासांच्या आत गुन्हयातील सराईत आरोपी १) कवु ऊर्फ फ्रान्सिस पॅट्रिक मॅनवेल रा. गायकवाड नगर, इगतपुरी २) वसिम मुसा शेख, रा. गायकवाड नगर, इगतपुरी ३) गुफरान सिकंदर शेख, रा. गायकवाड नगर, ता. इगतपुरी ४) मिथुन जयचंद दुभाषे, रा. खैरगाव, अचितवाडी, इगतपुरी, जि.नाशिक यांना ०६ तासाच्या आत जेरबंद केले असुन आरोपीतांनी गुन्हयात वापरलेले
१) एक देशी बनावटीचा कट्टा त्यात ५ जिवंत काडतुसे
२) दोन लोंखडी कोयते लाकडी मुठ असलेले
३) एक काळया मुठीचा चॉपर
४) एक काळया पिवळया रंगाची ऑटो रिक्षा क्रमांक एम.एच.१५, जे.ए.१४९९
५) एक सिल्वर ग्रे रंगाची होंडा सिटी कार क्रमांक एम. एच. ४३, आर.८६२२
वरीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक अदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण हरिष खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, पोलीस हवालदार निलेश देवराज, पोलीस हवालदार विनोद गोसावी, पोलीस हवालदार निकुंभ, पोलीस कर्मचारी कासार, विजय रुद्रे, गवळी, महिला पोलीस कर्मचारी मधे यांनी केली.