
चंद्रकांतदादांनी पडळकरांचं नाव घेत जे सांगितल ते धक्कादायक…
जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सातत्याने होत असतात. स्वतः जयंत पाटील यांनी या बाबात आपण कोठेही जात नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यात गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्याविषयी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांमुळे जयंत पाटील विरुद्ध पडळकर संघर्ष तीव्र झाला असताना जयंत पाटील हे भाजपमध्ये आले तर काय होईल, हे मंत्री चंद्रकात पाटील यांनी सांगितले आहे.
ते म्हणाले, ‘जयंतराव भाजपमध्ये येणार नाहीत. आणि जरी ते भाजपमध्ये आले तरी त्यांना गोपीचंद पडळकरच्या मागे बसावे लागेल. जिल्ह्यात गोपीचंद सिनीअर आहेत आणि ते ज्युनिअर. त्यांना घोषणा द्याव्या लागतील की गोपीचंद पडळकर तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है.’
विरोधकांना उद्देशून चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘तुम्ही म्हणताय जयवंतरावांना भाजपमध्ये आणण्यासाठी ही धडपड चालू आहे. पण ते कुणा कुणाला भेटतात, किती वेळा भेटतात?
‘सांगलीत झालेल्या सभेविषयी जयंतराव मला म्हणाले की ही सभा होऊ नये असं वाटत होते. पण एका नेत्याने भरीस घातलं. हा भरीस घालणार कोणता नेता आहे. तो भरीस घालणारा नेता वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोटाळ्यात आहे. त्याची ही जबाबदारी घेऊ. घोटाळ्याची चौकशी झाली तर गावातून पळून जातील’ , असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला.
शरद पवारांच्या पाच नेत्यांसाठी ‘चक्रव्यूह’
चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच नेत्यांसाठी चक्रव्यूह रचले आहे. पाच नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढू, असे म्हणत त्यांनी त्याची जबाबदारी देखील वाटून दिली. जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता ठाण्यातील एक नेता जिरा ताणून बोलत. एका बिल्डर गेला. त्याची डायरी आहे आपल्यापाशी. त्यात नाव आहे. त्याची जबाबदारी मी घेतो अंगावर, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.