
शर्मिला ठाकरेंनी दिले खास गिफ्ट !
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हा दसरा मेळावा ऐतिहासिक ठरणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या दसऱ्या मेळाव्याकडे लागले आहे.
त्यातच येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीसाठी राज व उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये गेल्या काही दिवसापासून जवळीकता दिसून येत आहे.
त्यातच राज ठाकरे यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असेल्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांचे उत्साहात स्वागत करून त्यांना सरप्राइज करणारे गिफ्ट दिले.
दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवतीर्थावर चिखल असतानाही शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. पाऊस असला तरी शिवसैनिकांचा उत्साह कमी झाला नाही. त्यातच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी याठिकाणी मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना मिठाई देऊन तोंड गोड केले. त्यांच्यासोबत त्यांनी संवाद साधल्यामुळे दसरा मेळाव्याला आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचा यंदाचा दसरा मेळावा खास आहे. ठाकरे बंधुंच्या मनोमिलनानंतर नवा उत्साह दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दसरा मेळाव्याला आलेल्या शिवसैनिकांचे शर्मिला ठाकरे यांना मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे.
शर्मिला ठाकरे यांनी दसरा मेळाव्याला आलेल्या शिवसैनिकांचे मिठाई वाटून तोंड गोड करत त्यांना खास शुभेच्छा दिल्या. दसऱ्याच्या निमित्ताने त्यांनी शिवसैनिकांना केवळ मिठाईच नाही, तर त्यासोबत दसऱ्या सणानिमित्त सोने (आपट्याची पाने) देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे शिवसैनिकात नवचैतन्य पसरले आहे.
हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेल्या राज-उद्धव ठाकरे बंधूनी एकत्र येत मेळावा घेतला होता. त्यानंतर गेल्या दोन महिन्यात विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने ते चर ते पाच वेळा एकत्र आले आहेत. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मनसेची युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या दोन्ही बंधूंमधील जवळीकता वाढत असून शिवतीर्थावर मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना शर्मिला ठाकरेंनी मिठाई वाटप केली असल्याने यामधून येत्या काळात होत असलेल्या मैत्रीपूर्ण राजकारणाचे संकेत मिळत आहेत.