
ती ‘गर्दी भाडोत्री’ !
दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे गुरुवारी मुंबईत झाले. दोन्ही मेळाव्यात पक्षनेत्यांनी परस्परांना टीकेचे लक्ष्य केले. आता एकनाथ शिंदे यांच्या सभेला असलेल्या गर्दीबाबत सुषमा अंधारे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावरल खोचक टिका केली.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा पारंपारिक दसरा मेळावा मुंबईत शिवतीर्थावर झाला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नेस्को मैदानावर मेळावा घेतला होता. या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर टीका केली होती.
हे दोन्ही मिळावे समर्थकांसाठी चर्चेचा विषय आहे. काल सभा झाल्यानंतर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यावर टीकास्त्र सोडले. पाठोपाठ सुषमा अंधारे यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
या संदर्भात श्रीमती अंधारे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मेळाव्याला जमलेली गर्दी भाडोत्री होती, असा गंभीर आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण सुरू होतात ही भाडोत्री गर्दी तेथून बाहेर पडू लागली. सभेला उपस्थित लोकांनी काढता पाय घेतल्याने, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण टिकेचा विषय आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण सुरू असताना मोठी गर्दी बाहेर पडत होती. गर्दीला अडवण्यासाठी लेस्को मैदानाचे गेट बंद करण्यात आले होते. गर्दीला कोंडण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे शिंदे यांचे भाषण जबरदस्तीने लोकांना ऐकावे लागले.
श्रीमती अंधारे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याचे कौतुक केले. या मेळाव्याला निष्ठावंतांची गर्दी ओसंडून वाहत होती. पाऊस सुरू असतानाही उपस्थित त्यांनी उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकले.
उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना गर्दी तसुभरही हलली नाही. निष्ठावंत जीवाचा कान करून उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकत होते. दुसरीकडे गद्दारांच्या इव्हेंटला जमवलेली भाडोत्री गर्दी होती. शिंदे यांचे भाषण सुरू होताच या गर्दीने काढता पाय घेतला.
दसऱ्याचा मेळावा झाल्यावर पक्षाच्या नेत्यांनी पुन्हा एकदा एकमेकांवर टीकेचे बांध सोडले आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा शिवसेनेच्या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेचा होता. मी महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याने आता नेत्यांनीही प्रतिस्पर्ध्यांच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे.