
जेजुरी प्रतिनिधी : संदिप रोमण.
पुरंदर जेजुरी : ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार कडील सूचनेनुसार आपल्या कार्यक्षेत्रात स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान राबवण्यात आले .
या अभियानात दिनांक २३ सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर २०२५ विशेष उपक्रम यशस्वीरित्या राबवणेबाबत मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने *ग्रामीण रुग्णालय जेजुरी* येथे दिनांक 30/09/२0२५ रोजी सदर शिबीर आयोजीत करण्यात आले होते. तसेच याच दिवशी *माहितीचा अधिकार अधिनियम 2005* अंतर्गत आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन सुद्धा उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे उदघाटन माहिती अधिकारी कार्यकर्ते बाळासाहेब लेंडे , किशोर खोमणे , नवनाथ खोमणे , नरेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर आरोग्य शिबीरामध्ये महिलांना व लहान बालके यांना केंद्रस्थानी ठेऊन विविध तज्ञ्यांच्या सेवा सह विशेष सेवा पुरविण्यात आली.
या शिबिरात डॉ.माया वानखेडे ग्रामीण रुग्णालय जेजुरी यांनी किशोरवयीन मुलिंना मासिक पाळीत करावयाची स्वच्छता व काळजीबाबत मार्गदर्शन केले.
तर बाळासाहेब लेंडे यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 विषयी प्रबोधन करताना नागरिकांमध्ये जनजागृती घडवुन आणली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जेजुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप साळवे , वैद्यकीय अधीकारी डॉ. माया वानखेडे , महा.अधीक्षक डॉ. विजय पवार , इन्चार्ज सिस्टर श्रीमती सोनल पवार व मुख्य औषध निर्माण अधिकारी श्री. हितेश गायकवाड यांनी नियोजन केले.
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा लाभ जेजुरी येथील दादा जाधवराव विद्यालयातील विध्यार्थिनींनी व जेजुरी परिसरातील किशोरवयीन मुलींनी आणि जेजुरीतील महिला भगिनींनी तसेच नागरिकांनी हि घेतला.