
जेजुरी प्रतिनिधी : संदिप रोमण
जेजुरी पुरंदर : ग्रामीण कृषी जागरूकता आणि कार्यानुभव कार्यक्रम RAWE अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथील कृषिकन्यांनी शास्वत शेती बद्दल जनजागृती कार्यक्रम राबवला या कार्यक्रमाअंतर्गत रायझोबीयम, ऍझेटोबॅक्टर,ऍझोस्पिरिलम वापरून नत्र स्थिरीकरण कसे होते, तसेच मेटारायझियमच्या वापराने फळपिकांवरील रस शोषणाचा किड्या, हुमणी आळी, मावा, तुडतुडे,पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव कमी कसा होतो आणि गांढुळ खताची निर्मिती व वापर याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
मधुमाक्षिका पालन शेती पुरक व्यवसाय यावर सविस्तर चर्चासत्र भरवण्यात आले.माती जिवंत आहे आणि पुढील पिढ्यांना हा वारसा मिळावा म्हणुन आपण तीच जतन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना शास्वत शेती बद्दल असणारे प्रश्न व त्याची सर्वानुमते दिलेली उत्तरे यांनी हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमादरम्यान वैष्णवी बनकर, नम्रता चांदगुडे, दिशा गोसावी,अदिती जाधव,आरती जगताप, साक्षी कदम, साक्षी कळंत्रे, प्रमिला केंगार या कृषीकन्यांचा सहभाग होता. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. महानंद माने केंद्र समन्वय डॉ. विजय तरडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. पल्लवी सूर्यवंशी व डॉ. दिप्ती वाघमारे यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम पार पडला.