
अनिल परब स्पष्टच बोलले; कोण येणार होते हे नितेश राणेंना…
एकनाथ शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दसऱ्या मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूसंदर्भात सनसनाटी दावे केले आहेत. त्यानंतर ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी जोरदार हल्ला केला आहे.
ते पुढे म्हणाले की, रामदास कदम यांचे 100 अपराध झालेले आहेत, ज्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आलेले आहेत. मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाचवलेलं आहे, मुख्यमंत्री का वाचवत आहेत? अशी तुमची काय मजबुरी आहे की ज्याच्यासाठी तुम्ही या लोकांना वाचवत आहात. एवढे अपराध, डान्सबार चालवतात, वाळूचोर आहेत, दादागिरी करताय, जमिनी लाटतायंत, माझ्याकडे सगळी प्रकरणे आली आहेत. कोणाकोणाच्या जमिनी, घरे, यांनी खाल्ली आहेत. कोणाकोणाला दादागिरी करुन बेघर केलेले आहे, त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे, पण ही आत्महत्या का केली? याचा देखील शोध गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे, त्याचे देखील कारण बाहेर आलं पाहिजे, अशी मागणीही अनिल परब यांनी केले.
त्याचबरोबर रामदास कदमांच्या पुतण्याने स्वतःला का संपवलं? त्यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं, ते जाळून घेतलं? का तिला जाळलं, का काय झालं? हे देखील नार्कोटेक्समध्ये आलं पाहिजे. कोणाला बंगले बांधून दिले, खेडमध्ये त्या बंगल्यावरुन काय राजकारण झालं, काय गोंधळ झाला हे सगळं आलं पाहिजे, असे गंभीर प्रश्न आमदार अनिल परब यांनी उपस्थित केले आहेत. तर पोरींना नाचवून पैसे खातो, त्याला मंत्रिपदावर राहायचा नैतिक अधिकार आहे का, भाडगिरीचे पैसे खायची सवय नाही, या शब्दात त्यांनी टीका केली.
रामदास कदम नार्को टेस्टची मागणी करत असेल तर मी पण करतोय, मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांच्या जे काही ठसे घेतली आहेत त्याची नार्को टेस्ट आणि 1993 साली ज्योती रामदास कदम यांनी स्वत:ला जाळून का घेतले याचीही नार्को टेस्ट करावी अशी अनिल परब यांनी केली आहे.