
कार्तिकी शुद्ध एकादशी रविवार (दि. 2 नोव्हेंबर) रोजी आहे. यात्रा कालावधी 22 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर असा राहणार आहे. कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
दोन उपमुख्यमंत्री असल्याने यंदा कार्तिकी एकादशीची श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूज कुणाच्या हस्ते करावी, याबाबत मंदिर समितीने शासनाकडून मार्गदर्शन मागविले होते. त्यावर सोमवारी (दि. 6) शासनाने लेखी मार्गदर्शन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूजा करण्यात येणार आहे. त्यामुळे मंदिर समिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुजेचे निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी शेळके यांनी दिली.