
बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळीकडून मोठमोठ्या घोषणा करण्यात येत आहेत.
या अनुषंगाने आता बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एक मोठी घोषणा केली आहे. बिहारमध्ये त्यांच्या पक्षाचं सरकार आल्यास प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देण्याच्या संदर्भात कायदा करणार असल्याचं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.