
दोन दिवसांत करणार मोठी घोषणा…
भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारने पीएम किसान योजना राबवली आहे. या योजनेच्या २१व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत.
मोदी सरकार ११ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची घोषणा करणार आहे. ४२०० कोटींच्या योजना लाँच केल्या जाणार आहेत. दरम्यान,या कार्यक्रमात पीएम किसान योजनेचा हप्ता येणार की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
मिडिया रिपोर्टनुसार, ११ ऑक्टोबर रोजी सरकार शेतकऱ्यांसाठी याआधी सुरु केलेल्या योजना पुन्हा सुरु करु शकतात.सरकारने याआधी १६ जुलै रोजी पंतप्रधान धन धन योजना सुरु केली होती. या योजनेचा १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या योजनेसाठी सरकारने २४ हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. दरम्यान, या कार्यक्रमात या योजनेबाबत मोठी घोषणा होऊ शकते.
११ ऑक्टोबरला पीएम किसानच्या हप्त्याची घोषणा होणार?
पीएम किसान योजनेच्या २१व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. दरम्यान, ११ ऑक्टोबर रोजी याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. अनेक राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता आधीच जारी केला आहे.हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे २००० रुपये दिले आहेत. दरम्यान, त्यानंतर आता इतर राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते.