
निराश होऊन रडक्या चेहऱ्याने म्हणाले; मला नोबेल पुरस्कार न…
डोनाल्ड ट्रम्प सतत नोबेल शांती पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, हा पुरस्कार मिळवणे इतके सोपे नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, यंदा डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळणे शक्य नाही.
स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनीही म्हटले की, नोबेल पुरस्कारच्या कमिटीने नोबेल शांती पुरस्कारासाठी दुसऱ्या कोणाला निवडले. डोनाल्ड ट्रम्प सतत दावा करत आहेत की, मी जगातील मोठी सात युद्धे रोखली आहेत. नुकताच, बोलताना स्वीडन प्रोफेसर पीटर वालेनस्टीन यांनी म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांना यावर्षी नोबेल शांती पुरस्कार मिळणार नाही. हा पण पुढच्या वर्षी त्यांना पुरस्कार मिळू शकतो.
तोपर्यंत गाझामध्ये खरोखरच शांतता प्रस्तापित होते का? हे देखील स्पष्ट होईल. रिपोर्टनुसार, यावर्षी 338 लोक नॉमिनेशन प्रक्रियेत आहेत. मात्र, याची यादी गुप्त ठेवण्यात आली. या यादीत काही खासदार, व्यावसायिक, सरकारी अधिकारी आणि ज्यांना यापूर्वी नोबेल पुरस्कार मिळाला आहे, त्यांच्याही नावाचा समावेश आहे. 2024 मध्ये हा पुरस्कार जपानच्या बॉम्ब हल्ल्यानंतर लोकांसाठी झगडणाऱ्या निहोन यांना मिळाला होता.
भारतीय वेळेनुसार, नोबेल पुरस्काराची विजेत्यांच्या नावाची घोषणा शुक्रवारी दुपारी 2 वाजून 30 मिनिटांना होईल. डोनाल्ड ट्रम्प हे नुकताच पत्रकारांना नोबेल शांती पुरस्काराबद्दल बोलताना म्हणाले की, मला याबद्दल काही कल्पना नाहीये. मी आतापर्यंत सात युद्ध थांबवली आहेत. फक्त 8 आठवड्यांमध्ये. मला मनातून वाटते की, मी रशिया युद्ध देखील लवकरच थांबवेल. मला खरोखरच वाटत नाही तर इतिसहासामध्ये कोणत्या व्यक्तीने इतकी जास्त युद्ध थांबवली असतील.
हा पण मला नोबेल शांती पुरस्कार न देण्याचे दुसरे कोणते कारण असेल. डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून नोबेल शांती पुरस्कारासाठी आग्रही होते. मात्र, आता त्यांनी या पुरस्काराचा दावा करणे बंद केले असून ते निराश झाल्याचे बघायला मिळतंय. नोबेल शांती पुरस्कार जाहीर होण्याच्या अगोदरच त्यांनी मोठे संकेत दिले असून हा मोठा धक्का नक्कीच म्हणावा लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांचे नोबेल शांती पुरस्काराचे स्वप्न भंगताना दिसत आहे.