
जगाची चिंता वाढली…
डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून धक्कादायक निर्णय घेत आहेत. त्यांच्या या निर्णयाचा परिणाम फक्त अमेरिकाच नाही तर जगावर होत आहे. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर त्यांनी आता थेट चीनवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा हैराण करणारा निर्णय घेतला.
ब्राझीलवरही 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला असून ब्राझीलने अमेरिकेसोबतचे सर्व संबंध तोडली आहेत. ट्रम्प यांनी आता मेक्सिकोशी सामना करण्याचा निर्णय घेतला आहे. नोबेल शांतता पुरस्कार मिळाला नसल्याने डोनाल्ड ट्रम्प निराश झाले. त्यांनी आपली नाराजी जगजाहीरपणे बोलून दाखवली. भारत-पाकिस्तान युद्धाबाबत ते मोठा दावा करताना दिसले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याला भारताने साथ दिली नाही.
नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत गुप्त आदेशावर सह्या केल्या. या कायद्यानुसार, लॅटिन अमेरिकन ड्रग्ज कार्टेल्सविरुद्ध अमेरिकेची लष्करी कारवाई परदेशात करता येईल. याचा अर्थ ट्रम्प यांनी मेक्सिकोमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच मेक्सिकोमधून येणारे जहाल थेट अमेरिकेने उडवून दिले आणि दावा केला की, या जहाजमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज होते, त्यानंतर अमेरिकन लष्कराने कारवाई केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत आदेशावर सह्या केल्याने आता नौदल आणि इतर लष्करी तुकड्यांना परदेशी किनाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची परवानगी मिळाली. मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, अमेरिकन सैन्याला मेक्सिकोमध्ये प्रवेश दिला जाणार नाही किंवा अमेरिकन सैन्य मेक्सिकोच्या भूमीत येऊन कोणत्याही प्रकारची कारवाई करू शकणार नाही. ड्रग्ज विरोधात आम्ही सहकार्य करू आणि समन्वय साधू पण लष्कराचा हस्तक्षेप सहन करणार नाहीत.
कार्टेल्सविरुद्ध कोणतीही कारवाई दोन्ही देशांच्या सार्वभौमत्वाच्या आत आणि करारानुसार केली जाईल. ट्रम्प प्रशासनाने आठ ड्रग्ज कार्टेलना दहशतवादी संघटना म्हणून औपचारिकपणे घोषित केले. त्यापैकी सहा मेक्सिकन संघटना आहेत. आता मेक्सिकोविरोधातील कारवाई डोनाल्ड ट्रम्प यांची वाढवण्याचे संकेत दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून जगाला हादरवणारे निर्णय घेताना सतत दिसत आहेत.