टाकून टाकून किती पडदे…
रोहित पवार यांनी राज्यभरात चर्चेस असलेली गुंडांची प्रकरणं अतिशय गंभीर असून या प्रकरणात भूमिका मांडणारे अनिल परब, रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांना सरकारने तत्काळ पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी केली होती.
त्यातच आता रवींद्र धंगेकर यांचं कौतुक करण्याऐवजी त्यांनी हे प्रकरण थांबवावे असे आदेश दिले जात असतील तर राजकारणाचा स्तर किती खाली गेला याचा विचार करणे गरजेचे आहे. टाकून टाकून किती पडदे टाकणार? असं रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
विद्येचे माहेरघर ही पुण्याची ओळख कधीच हरवली असून गुंडाचे, कोयता गँगचे, ड्रग्सचे पुणे अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. रवींद्र धंगेकर जर गुन्हेगारांना उघडे पाडत असतील तर त्याचं कौतुक करण्याऐवजी त्यांनी हे प्रकरण थांबवावे असे आदेश दिले जात असतील तर राजकारणाचा स्तर किती खाली गेला याचा विचार करणे गरजेचे आहे. टाकून टाकून किती पडदे टाकणार ? ज्याप्रमाणे सुलतान मिर्झाने मुंबई गुंडांमध्ये वाटली तसेच पुणे शहर तिन्ही पक्षांनी वाटून घेतले आहे. पुण्याचा मनपा आयुक्त नगरविकास मंत्री बसवतात, पुण्याचा CP गृहमंत्री बसवतात, पुण्याचा कलेक्टर पालकमंत्री बसवतात. वरिष्ठांच्या आशीर्वादाने, स्थानिक पुढाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, गुंडाच्या मदतीने पुण्याची वाटलावली जातेय…राजकीय पक्षांनी आत्मचिंतन करावे. असं रोहित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, दरम्यान, रोहित पवार यांनी गुरुवारी पत्रकार खळबळजनक आरोप केले होते. त्यांनी म्हटले होते की, राम शिंदे आणि संतोष बांगर हे निलेश घायवळ याला सहजपणे अधिवेशनात घेऊन येतात. परंतु माझा प्रश्न आहे की, या गुंडाला आत येण्याची परवानगी कशी मिळते? तसेच हे गुंड अधिवेशनात येऊन रिल काढतात. तानाजी सावंत यांचा याप्रकरणाशी थेट संबंध नसला तरी त्यांच्या कुटुंबातील लोक यामध्ये गुंतलेले आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी राज्यभरात चर्चेस असलेली गुंडांची प्रकरणं अतिशय गंभीर असून या प्रकरणात भूमिका मांडणारे अनिल परब, रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांना सरकारने तत्काळ पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. त्यातच आता रवींद्र धंगेकर यांचं कौतुक करण्याऐवजी त्यांनी हे प्रकरण थांबवावे असे आदेश दिले जात असतील तर राजकारणाचा स्तर किती खाली गेला याचा विचार करणे गरजेचे आहे. टाकून टाकून किती पडदे टाकणार? असं रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?