
पाकड्यांचा नीचपणा जगापुढे आणि हादरवणारा विचित्र करार; अफगाणिस्तान…
तालिबान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला. 58 सैनिक पाकिस्तानचे अफगाणिस्तान सैन्याने ठार केल्यानंतर फार काही आक्रमक भूमिका पाकिस्तान घेताना दिसत नाही. हेच नाही तर अफगाणिस्तानने मोठा इशारा देत स्पष्टपणे म्हटले आहे की, जर तुम्ही आमच्यावर पुन्हा हल्ला करण्याचा विचार करत असला तर हे तुमच्यासाठी घातक आहे, आम्ही आमच्या देशाच्या सुरक्षेसाठी तयार आहोत.
काबुलमध्ये पाकिस्तानने हल्ला केला आणि त्यानंतर अफगाणिस्तानने थेट पाकिस्तानच्या लष्कर चाैक्यावर मोठा हल्ला चढवला. अफगाणिस्तानच्या ताब्यात पाकिस्तानचे 7 सैनिक आहेत. आता या सात सैनिकांची सुटका करण्यासाठी घाणेरडा साैदा करायला पाकिस्तान सैन्य निघाले आहे.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील सीमा पुन्हा एकदा अशांत आहे, पाकिस्तानी सैन्य आणि अफगाण तालिबान यांच्यात एक विचित्र मृतदेहांचा व्यवहार सुरू झाला आहे. टोलो न्यूजच्या सूत्रांनुसार, हेलमंड प्रांतातील बहरामचा भागात पाकिस्तानी सैन्याने सात अफगाण नागरिकांची हत्या केली. आता ही हत्या केल्यानंतर या नागरिकांचे मृतदेह परत कुटुंबियांना देण्यासाठी मोठा साैदा करण्यास सुरूवात केली. सध्या हे मृतदेह पाकिस्तानी सैन्याने आपल्याच ताब्यात ठेवली आहेत.
ही सात मृतदेह तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या सात सैनिकांची ओलीसीतून सुटका करा. आमचे सात सैनिक परत करा आणि हे तुमच्या सात नागरिकांचे मृतदेह घ्या, अशी धक्कादायक अट पाकिस्तानी सैन्याने ठेवली. अफगाण सरकारशी यावर अद्याप चर्चा झालेली नसली तरी, सीमेवर यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहेत. या घटनेमुळे पाकिस्तानाचा खरा चेहरा जगापुढे आल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, अफगाणिस्तानने यावर अजून काही भूमिका घेतली नाही.
यावर बोलताना हेलमंड प्रांतातील अधिकाऱ्यांनी म्हटले की, त्यांच्याकडे डुरंड रेषेपलीकडे काय घडत आहे याबद्दल कोणतीही अचूक माहिती नाही. याचा अर्थ असा की अफगाण अधिकाऱ्यांनाही संघर्षाच्या संपूर्ण व्याप्तीची माहिती नाही. मात्र, हा संघर्ष टोकाला गेल्याचे स्पष्टपणे बघायला मिळत आहे. साैदी अरेबिया, इराण यांनी या युद्धात दोन्ही देशांना शांततेची भूमिका घेण्यास सांगितले आहे.