
पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणी शिवसेनेचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह कोथरूड येथील उद्योजक समीर पाटील यांच्यावर आरोप करत आहे.आत्ता या प्रकरणी उद्योजक समीर पाटील यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोप प्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असून जर दोन दिवसांत त्यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाची पुरावे दाखवली नाही तर न्यायालयात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिल.
पुण्यात आज उद्योजक समीर पाटील यांची या संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.
यावेळी समीर पाटील म्हणाले की रविंद्र धंगेकर हे आठ दिवसांपूर्वी माझ नाव घेत माझ्यावर कोणतेही पुरावे सादर न करता आरोप करत आहे.मी मकोका की सारख्या गुन्ह्यातील गुन्हेगार असल्याचं आरोप केलं जात आहे.कोणतेही पुरावे नसताना माझ्यावर ते आरोप करत आहे. तसेच माझ्या म्हणण्यावर पोलीस खोटे गुन्हे दाखल करत आहे.सागर सुभाष गवसणे याला मी ओळखत नाही.हा उस्मानाबाद बीड जामखेड येथे त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहे.तसेच कोथरूड पोलिस स्टेशनच्या हद्दीत १३ तारखेला कुठलंही गोळीबार झालेलं नसून मी कुठेही पोलीस अधिकाऱ्यांना फोन देखील केलेलं नाही.मी अश्या व्यक्तींवर आत्ता यापुढे उत्तर देणार नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितल.
ते पुढे म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी माझ्यावर जे काही आरोप केले आहे ते आरोप चुकीच असून विरोधात मी न्यायालयात ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असल्याचं यावेळी त्याने सांगितल तसेच दोन दिवसांत उत्तर दिलं नाही तर न्यायालयात गुन्हा दुखलं करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.