
सोडणार नाही; यांचं टार्गेट ओबीसी नसून फडणवीस छगन भुजबळांच्या विधानाने…
ओबीसी समाजाची एल्गार सभा बीडमध्ये आयोजित करण्यात आली आहे. राज्यभरातील ओबीसी नेते या सभेला हजर आहेत. या सभेत बोलताना मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.
विखे आला आणि सर्व महाराष्ट्रात विखार पसरवून गेला. गेला तर गेला, जीआर काढला असं भुजबळ म्हणाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
विखे आला आणि सर्व महाराष्ट्रात विखार पसरवून गेला
आपल्या भाषणात बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ‘2 सप्टेंबरला एक जीआर निघाला. त्याविरोधात आम्ही कोर्टात गेलो तर आम्हाला न्याय मिळेल. आम्ही दुहेरी लढाई लढणार आहे. एक न्याय देवतेकडे. दुसरा रस्ता आमच्याच बापाचा आहे. मला सांगतात येऊ नका. विखे कसा काय आला. विखे आला आणि सर्व महाराष्ट्रात विखार पसरवून गेला. गेला तर गेला, जीआर काढला. विखेंनी जीआर हातात घेतला.त्याच्या हातात एक जीआर दिला. विखेंना म्हटले बसा. पात्र शब्द काढा. एक तासात पात्र शब्द काढला.’
त्यांचं टार्गेट ओबीसी नाही, फडणवीस आहे – भुजबळ
छगन भुजबळ म्हणाले की, ‘मुख्यमंत्री नागपूरला होते. यांनी निर्णय घेतला. पात्रही शब्द काढला. सीएमला सांगायचं आहे. सावधान. ही मंडळी तुमच्या वाईटावर आली आहे. तुम्हाला अडचणी निर्माण करणारं आहे. त्यांचं टार्गेट ओबीसी नाही. फडणवीस आहे. भाजपच्या नेत्यांना सांगतो, आज तुम्हाला ओबीसीच्या ताकदीवर 135 आमदार मिळाले. त्या ओबीसीवर अन्याय कराल तर ओबीसी दुधखुळे राहिले नाही. त्यामुळे लवकरात लवकर यात मार्ग काढावा लागेल.’
विखे वारंवार दरिंदे पाटलांना भेटत आहेत – भुजबळ
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, ‘विखे वारंवार दरिंदे पाटलांना भेटत आहेत. आम्ही त्यांना सोडणार नाही. भाजपला सांगतो तुमच्या नेत्यांना आवरा. आम्ही रस्त्यावर लढू. कोर्टात लढू. आम्ही तुमच्या पाट्या उचलल्या. एक दिवस असा येईल आमचा भटका विमुक्त पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंज्या उचलायला लावणार नाही. हे तुम्ही केलं. हे संकट तुम्ही केलं. मराठा नेते मूग गिळून बसले आहे. त्याचा अभ्यास नाही. आरक्षण कशाला खातात माहीत नाही. तो सांगतो आणि तुम्ही टाळ्या वाजवता. फक्त राजकीय फायद्यासाठी. तुमचं नुकसान कसं करायचं हे सुद्धा माहीत आहे. हे लक्षात ठेवा.’