उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी…
आगामी महापालिका आणि झेडपी निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा चांगलीच आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या गाठीभेटीही वाढल्यात.
अशातच आता राज ठाकरेंची महाविकास आघाडीतही एंट्री झालीय का अशी चर्चा सुरु झालीय. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटले. यावेळी राज ठाकरे देखील यावेळी उपस्थित होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत घेण्याबाबत काँग्रेस तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. अशातच आता राज ठाकरेंबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भमिका काय आहे. राज ठाकरेंना सोबत घ्यायचे की नाही याबाबत शरद पवार काय निर्णय घेणार. शरद पवार यांच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्राचे राजकारण बदलणार आहे.
मनसेला सोबत घेण्यावरुन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात दोन मतप्रवाह असल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरेंसोबत युती नको अशी भूमिका एका गटाने घेतल्याचं समजत आहे. राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकांमुळे फटका बसू शकतो अशी भावना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांकडे व्यक्त केल्याचं समजत आहे. मनपा, झेडपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पवारांच्या नेतृत्वात 2 दिवस बैठका पार पडल्या. या बैठकांमध्येव स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत पवार यांनी जाणून घेतलं. तसेच स्थानिक पातळीवर युती कोणत्या पक्षासोबत करायची हे ठरवण्याचे अधिकारी देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.
राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतल्या संभाव्य समावेशाला काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी विरोध केलाय. एवढंच नाहीतर काँग्रेस नेते भाई जगतापांचाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी आघाडीला विरोध असल्याचं सांगितलंय. काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांना गायकवाड आणि जगतापांची भूमिका मान्य नाही. मनसेनं यावरुन काँग्रेसवर टीका केलीय. तर उद्धव ठाकरेंच्या पक्षानं गायकवाड-जगतापांच्या मताला फारसं महत्व देत नसल्याचं सांगितलंय. काँग्रेस नेत्यांनी राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबतची भूमिका जाहीरपणे उघड केली आहे. आता शरद पवार का. निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


