अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणाव सातत्याने वाढताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण मंत्रालयाला नुकताच आण्ववस्त्र टेस्टिंगचा आदेश दिला आहे. यानंतर, रशियाकडूनही तत्काळ प्रतिक्रिया आली आहे.
अमेरिका कोणते पाऊल उचलते यावर रशिया आपली पुढील भूमिका ठरवेल, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे.
पेस्कोव्ह म्हणाले, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात, काही देश आण्वस्त्रांची चाचणी घेत असल्याचे म्हटले आहे. मात्र आमच्याकडे अद्याप अशी कोणतीही माहिती नाही. जर हे विधान ब्यूरवेस्टिनक चाचणीसंदर्भात असेल, तर ही कोणत्याही प्रकारची अण्वस्त्र चाचणी नाही.
..आम्ही परिस्थितीनुसार पाऊल उचलू –
पेस्कोव्ह म्हणाले, सर्वच देश आपापली सुरक्षा प्रणाली विकसित करत आहेत. मात्र त्या आण्वस्त्र चाचण्या नाहीत. अमेरिका येक सार्वभौम देश असल्याने त्याला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मात्र मी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विधानाची आठवण करून देतो, “जर अमेरिकेने आण्वस्त्र चाचणीवरील बंदी हटवली, तर आम्ही परिस्थितीनुसार पाऊल उचलू.
रशियाने २६ ऑक्टोबर रोजी क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. या घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत अमेरिकेने अण्वस्त्रांच्या चाचणीला मंजुरी दिली. याचवेळी, आण्विक सामर्थ्याच्या बाबतीत अमेरिका सर्वांत पुढे आहे, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.
कुणाकडे जास्त अण्वस्त्र? –
आईएएनएसनुसार, ‘फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स’ने ९ देशांकडील अण्वस्त्रांची संख्य जाहीर केली आहे. यानुसार, २०२५ पर्यंत रशियाकडे ५,४४९ अण्वस्तर तर नाटो देशांकडे एकूण ५,७९२ अण्वस्तर आहेत. यांत एकट्या अमेरिकेकडे ५,२७७ एवढी अण्वस्त्र आहेत.


