दैनिक चालु वार्ता ठाणे ग्रामीण प्रतिनिधी -विकी जाधव
ठाणे,दि.05 :कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी Posh Act 2013 मधील कलम 4 अन्वये ज्या कार्यालयामध्ये 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी असतील अशा सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. ज्या खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती स्थापन करण्यात आलेली नाही, अशा आस्थापनांवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हा अधिकारी, स्थानिक समिती तथा उपजिल्हाधिकारी (समान्य प्रशासन), जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांना आहेत. त्यानुसार संबधित आस्थापनांनी तात्काळ आपल्या कार्यालयात अंतर्गत समिती स्थापन करून त्याबाबतचा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, ठाणे यांना सादर करावा. ज्या आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती आढळून येणार नाही, अशा आस्थापनांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
तसेच खाजगी व शासकीय कार्यालयात स्थापन केलेल्या अंतर्गत समितीची नोंदणी केंद्र शासनाच्या SHE BOX PORTAL वर नोंदणी करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांनी SHE BOX PORTAL वर अतंर्गत समितीची नोंदणी करावी.
SHE BOX पोर्टलवर खाजगी आस्थापनेतील अंतर्गत समिती नोंदविण्याची कार्यपध्दती पुढील प्रमाणे…..
SHE Box पोर्टलवर अंतर्गत समिती नोंदविण्यासाठी https://shebox.wed.gov.in या वेबसाईटवर जाऊन होम स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे अंतर्गत समिती नोंदवा (Private Head Office Ragistration) या टेब वर Click करुन आवश्यक त्या सर्व महितीचा तपशील भरुन Submit या Tab वर Click करुन अंतर्गत समितीची माहिती नोंदवता येईल.
तसेच यानंतर प्राप्त होणारा USER ID व PASSWORD वापरुन आपल्या आस्थापनाच्या अंतर्गत समितीची माहिती SHE BOX PORTAL वर भरण्यात यावी, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ठाणे नमिता शिंदे यांनी कळविले आहे.



