गिल-अय्यरच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी…
भारत आणि साउथ आफ्रिका ए टीम्समधील कसोटी मालिके नंतर, दोन्ही टीम्समधील तीन सामन्यांची वनडे मालिका देखील होणार आहे. या वनडे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने भारताची ए टीम जाहीर केली आहे.
टीम जाहीर होण्यापूर्वी नवीन कर्णधाराच्या नावावर चर्चेला सुरुवात झाली होती. भारताच्या वनडे टीमचा कर्णधार शुभमन गिल आहेत. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताच्या ए टीमचा कर्णधार श्रेयस अय्यर होता, पण आता साउथ आफ्रिका ए विरुद्ध मालिकेसाठी तिलक वर्मा टीमला नेतृत्त्व करणार आहेत.
साउथ आफ्रिका विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताच्या ए टीमचा कर्णधार तिलक वर्मा बनवण्यात आले आहेत. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताच्या ए टीमचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे होते. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनीत तिसऱ्या वनडे दरम्यान अय्यर जखमी झाले आणि त्यांना सिडनीतील रुग्णालयात दाखल करावे लागले. श्रेयस आता ठीक आहे, पण अजूनही जखमेवरून रिकव्हरी करत आहे. अय्यर पूर्णपणे फिट झाल्यानंतरच टीममध्ये परत येऊ शकतो.
शुबमन गिलकडे वनडेमध्ये भारताच्या सीनियर टीमचे नेतृत्व आहे. सध्या गिल ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पाच सामन्यांची टी20 मालिका खेळत आहेत. त्यानंतर भारतात परतल्यानंतर ते दक्षिण आफ्रिका सीनियर टीमविरुद्ध कसोटी मालिकाही खेळतील, ज्याचे नेतृत्व स्वतः शुबमन गिल करणार आहे. अशा परिस्थितीत गिल साउथ आफ्रिका ए टीमविरुद्धच्या वनडे मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही.


